Maharashtra News : अखेर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा

School Staff Recruitment : राज्य शासनाने महाराष्ट्रातील शाळांतील शिक्षकेतर पदे अनुकंपा नियुक्ती आणि १००% नामनिर्देशनाच्या आधारावर भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेली पदभरती प्रक्रिया आता सुरू होईल.
School Staff Recruitment
School Staff Recruitment Sakal
Updated on

पुणे : राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अंशतः/पूर्णतः तसेच अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील कनिष्ठ लिपिक, पूर्णवेळ ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसह १०० टक्के नामनिर्देशनाने भरण्यास राज्य शासनाने अखेर मान्यता दिली. या निर्णयामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com