
पुणे : विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देताना अनेक खासगी शिकवणी वर्ग चालविणारे व्यावसायिक आणि महाविद्यालय यांच्यात ‘टाय-अप’ झाल्याचे दिसून येते. परिणामी विद्यार्थ्यांची नोंद महाविद्यालयात आणि विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गात, असे चित्र राज्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये सर्रास दिसून येते. परंतु, आता खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने गतीने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. खासगी शिकवणी वर्गाचे नियमन करण्यासाठी परिपूर्ण अधिनियम करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.