

RTE Admission
esakal
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के जागा राखीव असतात. या जागांवरील प्रवेशासाठी राज्यातील १०० टक्के शाळांनी अद्याप नोंदणी आणि पडताळणी केलेली नाही. त्यामुळे, प्राथमिक शिक्षण विभागाने खासगी शाळांना नोंदणी आणि पडताळणीसाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता. ३०) मुदतवाढ दिली आहे.