सीना नदीकाठची पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी वसुली थांबवावी - प्रहार शेतकरी संघटना
MDH26B05167
माढा ः सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून पाटबंधारे विभागाने पाणीपट्टी वसुली न करता महापुरामुळे पाणीपट्टी माफ करण्याच्या मागणचे निवेदन तहसिलदार संजय भोसले यांना देताना पंडित साळुंके व पदाधिकारी.
सीना नदीकाठची पाणीपट्टी वसुली थांबवावी
प्रहार शेतकरी संघटनेची मागणी; २४ मार्चला आंदोलनाचा इशारा
माढा, ता. ६ : माढा तालुक्यातील सीना नदीला आलेल्या महापुरामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने पाणीपट्टी वसुली थांबवून शेतकऱ्यांना पाणीपट्टी माफ करण्याची मागणी प्रहार शेतकरी संघटनेने तहसीलदार संजय भोसले यांना निवेदन देऊन केली आहे.
सध्या पाटबंधारे विभागाने सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुली केली जात आहे. सीना नदीला आलेल्या महापुरामुळे ऊस शेती तसेच इतर पिकांबरोबर शेतजमीनीही खरवडून वाहून गेल्या आहेत. प्रत्यक्षात जमिनी जागेवर राहिल्या नाहीत. त्यामुळे पाटबंधारे विभागाकडून आकारलेली पाणीपट्टी शेतकऱ्यांना भरणे अशक्य आहे. त्यामुळे पाठबंधारे विभागाने शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसुली थांबवावी.
सीना भीमा बोगदा योजनाही विना खर्ची असल्याने शेतकऱ्यांना पाणीपट्टी आकारू नये. पाणीपट्टी वसुली न थांबवल्यास प्रहार शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सीना नदीत उड्या घेऊन २४ मार्चला आंदोलन करणार आहेत.
यावेळी संघटनेचे जिल्हा समन्वयक पंडित साळुंके, उंदरगावचे उपसरपंच समाधान मस्के, प्रहारचे विद्यार्थी सचिव संतोष कोळी, भास्कर कदम, रयतचे अण्णा जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

