दहीगाव टप्यातील वीजपुरवठा खंडित शेतकऱ्यांची नाराजी
बोगद्यावरील डीपींची वीज
पूर्वसूचना न देता खंडित
वीजवितरणविरोधात आंदोलनाचा शेतकऱ्यांचा इशारा
पांडे, ता. २१ ः उजनी धरण ते कोळगाव धरण दरम्यान भूमीगत बोगद्यावर फिसरे, सोदे, शेलगाव क, अर्जुननगर आदी गावांतील अनेक शेतकऱ्यांनी कुपनलिका घेऊन त्यावरती खासगी डीपी बसवल्या आहेत. सदर डीपी वर्षभरापासून सुरू आहेत. सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता असताना शेतकऱ्यांना पूर्वसूचना अचानक डीपीचे कनेक्शन कट करण्यात आले आहेत.
कोणाच्या सांगण्यावरून कनेक्शन कट करण्यात आले याबाबत परिसरातीत चर्चा रंगू लागल्या आहेत. राजकीय आकस भावनेतून वीज कनेक्शन कट करण्याची सूचना वीज मंडळाला दिल्याची चर्चा या भागामध्ये होत आहे.
विधानसभा निवडणूक, आजिनाथ कारखाना निवडणूक नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीनंतर हे कनेक्शन कसे कट होतात याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे सरफडोव, वरकाटणे, जेऊर, दहीगाव या भागातून हा बोगदा येतो. या परिसरातील डीपी मात्र सुरू आहेत. दरम्यान मी निवडून आलेल्या हिसरे गणतील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत. या विषयी वरिष्ठांशी बोललो आहे. लवकरच वीजपुरवठा सुरळीत करू आसे अश्वासन दिलेले होते. अद्याप वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, दोन दिवसांत हे डीपी पूर्ववत जोडले नाही तर शेतकऱ्यांना सोबत घेऊन वीजवितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भरत आवताडे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

