
पुणे : ‘महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३’ची तात्पुरती निवड यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मंगळवारी संकेतस्थळावर जाहीर केली. या आधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय मागविण्यात आला. या सेवेतील विविध संवर्गांतील एकूण २०२ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती.