
पुणे : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या जमिनींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार नियमित करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नऊ सदस्यांची समिती सरकारने स्थापन केली आहे. ही समिती या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आदर्श कार्यपद्धती तयार करणार असून, त्याचा अहवाल १५ दिवसांत सरकारला सादर करणार आहे.