
पिरंगुट : गड किल्ल्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांसाठी राज्यस्तरीय समग्र विकास आराखडा तयार करावा. मुळशी, भोर आणि वेल्हे या भागात अनेक शिवकालीन गडकिल्ले आहेत, परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नाहीत. या रस्त्यांची सुधारणा करावी जेणेकरून येथील पर्यटनाला चालना मिळेल, अशी मागणी आमदार शंकर मांडेकर यांनी विधानसभेत केली.