
पुणे : डिजिटल शिक्षणाच्या दिशेने महाराष्ट्राची वाटचाल सुरू झाली असून ‘महाज्ञानदीप’ या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून शैक्षणिक सुविधांचे लोकाभिमुखीकरण करण्यात आले आहे. राज्यात देशातील पहिले डिजिटल शिक्षण पोर्टल सुरू झाले आहे. या पोर्टलचा शुभारंभ मुंबईत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला.