
बाणेर मध्येही नव्या पोलीस स्टेशनला मान्यता मिळाल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बाणेर-बालेवाडी, पाषाण,सुतारवाडी,बावधन,सुस,म्हाळुंगे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
बालेवाडी - शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यामध्ये दहा नवीन पोलिस ठाण्यांना मंजुरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला.
पुणे महापालिकेच्या शाळांबाबत महत्वाची अपडेट, वाचा सविस्तर
बाणेर मध्येही नव्या पोलीस स्टेशनला मान्यता मिळाल्याने या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. बाणेर - बालेवाडी , पाषाण , सुतारवाडी , बावधन , सुस , म्हाळुंगे या परिसरात लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच चोरी , भांडणे , मारामारी असे अनेक गोष्टी नेहमीच होत असतात. त्यामुळे संबंधित पोलिस स्टेशनला जास्तीचे काम होत होते. पोलिस कर्मचाऱ्यांना देखील अतिरिक्त काम करावे लागत आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा ताण पडतो.
साठ वर्ष जे झाले नाही ते यंदा घडले ; पिसे ग्रामपंचायतमध्ये प्रथमच बिनविरोध निवडणूक
सर्वसामान्य नागरिकांना या निर्णयाबद्दल खुप मोठे समाधान वाटत आहे. तसेच गुन्हेगारीला मोठ्याप्रमाणात आळा बसून नागरिकां मधील असलेले भीतीचे वातावरण निश्चितच कमी होईल.
- नगरसेवक बाबुराव चांदेरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष
राज्यात बर्ड फ्लू रोगाचा संसर्ग नाही; पशुसंवर्धन विभागाची माहिती
महाराष्ट्र राज्य सरकारने या सर्व बाबींचा विचार करून बाणेर या परिसराकरिता स्वतंत्र पोलिस स्टेशनला मान्यता दिली. या निर्णय़ाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार ,गृहमंत्री अनिल देशमुख आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे बाणेर- बालेवाडी परिसरातील नागरिकांच्या वतीने मनापासून आभार मानले जात आहेत.