

IMA Maharashtra Strike
sakal
पुणे : सीसीएमपी (सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी) पात्रता प्राप्त बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल (एमएमसी)मध्ये स्वतंत्र नोंदणी सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने सोमवारी जारी केले. तसेच या डॉक्टरांच्या कार्यकक्षेची पात्रता, वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांवरील कार्यपद्धती (एसओपी) आणि नैतिक चौकट निश्चित करण्यासाठी सहा सदस्यीय समिती स्थापन करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.