
पुणे : नागरिकांकडून आलेल्या तक्रारी, दस्तनोंदणीत आढळून आलेली अनियमितता यामुळे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने भाडेकरारासाठी नेमलेल्या अधिकृत सेवा पुरवठादार (ए.एस.पी.) नियुक्ती रद्द केल्या आहेत. नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी याबाबतचे आदेश काढले.