Tanaji Sawant: 'हाफकीन' माणसाला बॅन करा; औषधांच्या संस्थेबद्दल आरोग्यमंत्र्यांचं अज्ञान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tanaji Sawant
Tanaji Sawant: 'हाफकीन' माणसाला बॅन करा; औषधांच्या संस्थेबद्दल आरोग्यमंत्र्यांचं अज्ञान

Tanaji Sawant: 'हाफकीन' माणसाला बॅन करा; औषधांच्या संस्थेबद्दल आरोग्यमंत्र्यांचं अज्ञान

राज्याचे नवे आरोग्यमंत्री तानाजी सावंत चांगलेच चर्चेत आहेत. घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर या त्यांच्या दौऱ्याची चांगलीच चर्चा झाली होती. त्यावरुन त्यांची थट्टाही केली जात होती. आता पुन्हा एकदा ते नेटकऱ्यांसाठी चेष्टेचा विषय ठरले आहेत.

सोशल मीडियावर सध्या तानाजी सावंत यांच्या संदर्भातल्या एका बातमीचं कात्रण व्हायरल होत आहे. या बातमीमध्ये तानाजी सावंत यांना हाफकीन ही व्यक्ती आहे की संस्था याची माहिती नसल्याचा उल्लेख आहे. या बातमीत उल्लेख आहे की तानाजी सावंत यांनी पुण्यातल्या ससून रुग्णालयात भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टरांना सुनावलं, रुग्णालयात कमी पडणाऱ्या औषधाबद्दलही त्यांनी संबंधितांना झापलं.

तुम्ही त्या हाफकीन माणसाकडून औषधं घेता ते आधी बंद करा, अशा शब्दांत सावंतांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना झापल्याचा उल्लेख या बातमीच्या कात्रणात आहे. पुढे या बातमीत लिहिलंय की डॉक्टरांना हे ऐकून हसू आवरेना, शेवटी मंत्र्यांच्या पीएनी त्यांना कानात सांगितलं की हाफकीन ही शासकीय संस्था आहे, माणूस नाही. तेव्हा त्यांनी तिथून काढता पाय घेतला.

यावरुन आता नेटकरी सावंतांची चांगलीच खिल्ली उडवत आहेत.आपल्या राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना शासकीय औषध संस्थाही माहित नाही, यावरुन त्यांना टोला लगावला जात आहे. अनेक जण या बातमीचं कात्रण व्हायरल करत आहेत. तसंच त्यांच्या अज्ञानाबद्दल त्यांची थट्टा करत आहेत.

Web Title: Maharashtra Health Minister Tanaji Sawant Gets Trolled On Hapkin Institute In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..