
महाराष्ट्रात मॉन्सूनने जोर धरला असून, कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आज (ता. १४ जून २०२५) रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान खात्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) जारी केला आहे. पुणे, मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) लागू आहे.