

Maharashtra Education
esakal
पुणे : "जगभरातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र हे अध्ययनाचे प्रमुख केंद्र म्हणून विकसित व्हावे, यासाठी राज्यातील विद्यापीठांनी प्रयत्न करायला हवेत. 'ह्यूमन कॅपिटल' विकसित करण्यासाठी उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, तसेच नव्या शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण, कौशल्याधारित आणि रोजगाराभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे," असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.