महामार्गावरील ५६ अतिक्रमणे हटविणार

महामार्गावरील ५६ अतिक्रमणे हटविणार
Published on

सकाळ वृत्तसेवा
वैभववाडी, (जि. सिंधुदुर्ग) ता. २० : तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे-गगनबावडा पट्ट्यात अतिक्रमण केलेल्या ५६ इमारतमालकांना महामार्ग प्रशासन न्यायालयाकडून प्राथमिक नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गालगतच्या इमारतधारकांमध्ये खळबळ उडाली आहे. ५६ मध्ये सर्वाधिक अतिक्रमित इमारती या वैभववाडी शहर आणि परिसरातील आहेत.
अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय महामार्गालगतचे सर्व अनधिकृत ढाबे, हॉटेल, दुकाने आणि व्यावसायिक अतिक्रमणे ६० दिवसांच्या आत हटवण्याचे निर्देश राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिले आहेत. या आदेशानतंर प्राधिकरण खडबडून जागे झाले आहे. प्राधिकरणाने आता प्राथमिक कार्यवाहीला प्रारंभ केला आहे. तळेरे-कोल्हापूर महामार्ग ८४ किलोमीटरचा असून त्यापैकी ५० किलोमीटरचे काँक्रिटीकरण झालेले आहे. महामार्गालगत काही पूर्वीपासून तर अलीकडे बेसुमार अतिक्रमणे झालेली आहेत. यातील तळेरे-गगनबावडा टापू सिंधुदुर्गच्या कार्यक्षेत्रात येतो. महामार्ग प्रशासन न्यायालयाने तळेरे-गगनबावडा महामार्गावरील ५६ इमारतधारकांना अतिक्रमण हटविण्याबाबतची प्राथमिक नोटीस बजावली आहे. नोटिसविरुद्ध काही हरकत असल्यास नोटीस प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग (खारेपाटण) यांच्याकडे द्यावयाची आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून सात दिवसांच्या आत अतिक्रमण काढून घ्यावे, असेही स्पष्ट केले आहे. यातील ५६ पैकी अधिकतर अतिक्रमणे वैभववाडी शहर आणि लगत आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई होणार असल्याने इमारत मालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com