
पुणे : तुम्हाला जमीन मोजणीसाठी लागणाऱ्या कालावधीतून आता दिलासा मिळाला आहे. यापूर्वी साधी, तातडीची आणि अतितातडीची अशा प्रकारांत मोजण्या होत होत्या आणि त्यानुसारच शुल्क आकारले जात होते. आता हे प्रकार बंद झाले असून, नियमित मोजणी आणि द्रुतगती मोजणी असे दोन प्रकार आणि त्यासाठीचे दर निश्चित केले आहेत. त्यांची अंमलबजावणी सोमवार (ता. २) पासून राज्यभरात लागू करण्यात आली आहे.