

Jaggery Industry Law
esakal
पुणे: पारंपरिक गुऱ्हाळांपासून मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपर्यंत विस्तारलेल्या गूळ उद्योगाला आता कायद्याच्या चौकटीत आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. स्वतंत्र कायद्याचा मसुदा साखर आयुक्तालयाने शासनाकडे पाठवला होता. शासनाने त्यामध्ये काही दुरुस्त्या व बदल सुचवले आहेत. त्यावर या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असून, सुधारित मसुदा पुन्हा शासनाला पाठविण्यात येणार आहे.