

Narayangaon KVK President Anil Meher presents a proposal for agricultural technology exchange to SKUAST-K Vice-Chancellor Dr. Nazir Ahmad Ganai in Srinagar.
Sakal
नारायणगाव : महाराष्ट्रातील आधुनिक, व्यावसायिक फलोत्पादन तंत्रज्ञान व जम्मू-काश्मीरमधील समशीतोष्ण फळपिकांचे प्रगत तंत्रज्ञान यांची परस्पर देवाणघेवाण करून दोन्ही राज्यांतील शेतकऱ्यांच्या विकासाला चालना देण्याचा निर्णय क्रालबाग ( जम्मू काश्मीर) येथे 10 ऑगस्ट 2026 रोजी द्राक्ष दिना निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात घेण्यात आला.या मुळे महाराष्ट्र व काश्मीर कृषी तंत्रज्ञान देवाणघेवाणीला नवी दिशा मिळणार आहे.अशी माहिती नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर यांनी दिली.