
Dattatray Bharne
Sakal
पुणे : ‘‘राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळावा, संशोधन प्रत्यक्ष शेतात उतरावे आणि तरुणांना कृषी क्षेत्रात करिअरची संधी मिळावी, या उद्देशाने राज्यात ‘स्मार्ट कृषी इनोव्हेशन केंद्रा’ची (सेंटर फॉर इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट इन स्मार्ट ॲग्रिकल्चर) स्थापना करण्यात येत आहे. प्रत्येक कृषी विद्यापीठात तीन याप्रमाणे राज्यात एकूण १२ केंद्रांना मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात सहा आणि दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रे सुरू होतील. केंद्रांमार्फत राज्यातील कृषी शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाला चालना देण्यात येईल,’’ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.