
पुणे : राज्यातील नऊ हजार ३७३ कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या तब्बल २० लाख ९२ हजार ३५० जागांसाठी विद्यार्थ्यांना येत्या सोमवारपासून (ता. २६) ऑनलाइन नोंदणी करता येणार आहे. यंदा पहिल्यांदाच संपूर्ण राज्यात अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘कॅप’ फेरीसाठी १८ लाख ७७ हजार ८३९ जागा, तर विविध कोट्यांतर्गत दोन लाख १४ हजार ५११ जागा उपलब्ध आहेत.