इंदापूर - ‘शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ झाली, मात्र त्या प्रमाणात धान्य मालाच्या विक्री किमतीमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे राज्यात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. हे केंद्र सरकारच्या आकडेवारीवरूनच दिसून येते,’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली.