

शहरात महाराष्ट्राची
लोकधारा कार्यक्रम
अहिल्यानगर, ता.९ ः जय असोसिएशन ऑफ एनजीओशी संलग्न उडान फाउंडेशनतर्फे भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, देशभक्तिपर गीत स्पर्धा, नृत्य स्पर्धा तसेच ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ऑगस्ट रोजी शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, टिळक रोड येथे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे. यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा राज्यस्तरीय उडान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात येणार आहे. यावेळी रूपाली करांडे, सागर ससाणे, ज्योत्स्ना शिंदे, प्रा. डॉ. शंकर अंदानी, रोहिणी थोरात, अनंत जोशी, विद्या जोशी, अनंत द्रविड, प्रा. च.वी. जोशी, सुनील राऊत, विनायक नेवसे, सुनील महाजन व राजेंद्र टाक, सागर खिस्ती, राजेश व्यवहारे, साधना काकडे, रजनी ताठे, प्रा. सुनील मतकर तसेच विद्या तन्वर यांनाही गौरविण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.