Malaria Cases Rise: राज्यात हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ;उपचार अन् वेळेवर निदानामुळे आजारावर नियंत्रण

21,371 Patients Reported in 2026 : महाराष्ट्रात यंदा हिवतापाच्या रुग्णसंख्येत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २१ ऑक्टोबरपर्यंत २१ हजार ३७१ रुग्ण आढळले असून १० जणांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.
Health department data shows a rise in malaria cases across Maharashtra, with Gadchiroli reporting the highest number.

Health department data shows a rise in malaria cases across Maharashtra, with Gadchiroli reporting the highest number.

esakal

Updated on: 

पुणे : राज्यात यंदा हिवतापाच्या (मलेरिया) रुग्णसंख्येत गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली. १ जानेवारी ते २१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राज्यात हिवतापाचे २१ हजार ३७१ रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी याच कालावधीत १८ हजार ९२१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे यंदा रुग्णसंख्येत सुमारे १३ टक्क्यांनी वाढ झाली. मात्र, हिवतापामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत घट झाली आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत १५ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यंदा ही संख्या १० वर आली आहे.

Loading content, please wait...