
Maharashtra's success with PM Matru Vandana Yojana
Sakal
पुणे : गर्भवती महिला व जन्माला येणाऱ्या बालकांना सकस आहाराद्वारे पोषण मिळावे, माता व बालमृत्यूदर कमी व्हावा, कुपोषणावर मात करता यावी यासाठी केंद्र सरकारने २०१७ मध्ये प्रधानमंत्री मातृ वंदना योजना सुरू केली. योजनेअंतर्गत त्यांना पाच हजार रुपयांचा हप्ता देण्यात येतात. या योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंत गेल्या सात वर्षांत राज्यात ४६ लाख महिलांच्या खात्यात १ हजार ८३८ कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. याद्वारे प्रसूतिपूर्व आणि प्रसूतीनंतरच्या काळात आवश्यक पोषण आणि आरोग्य सेवा मिळण्यास मदत झाली आहे.