
पुणे : राज्यातील बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी आता महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (एमएमसी) कंबर कसली असून सर्व नोंदणीकृत डॉक्टरांसाठी ‘क्यूआर कोड’ प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. ‘नो युअर डॉक्टर’ या उपक्रमांतर्गत ही प्रणाली लागू केली जाणार असून, यामुळे नागरिकांना डॉक्टरांची नोंदणी, पात्रता, आणि परवाना याची सविस्तर माहिती थेट मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बोगस डॉक्टरांना आळा बसेल, असा ‘एमएमसी’ला विश्वास आहे.