

Maharashtra to Frame New Cooperative Policy
Sakal
पुणे : ‘‘राष्ट्रीय सहकार धोरणाच्या धर्तीवर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आणि व्यापक सहकार धोरण तयार करण्यात येत आहे. हे धोरण सहकार क्षेत्रातील सर्व घटकांना सामावून घेणारे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाणारे ठरेल,’’ असा विश्वास सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केला. ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन आणि कॉसमॉस सहकारी बँकेच्या वतीने रविवारी (ता. २१) आयोजित ‘सहकार मंथन’ या राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.