Video: मी, मुख्यमंत्री होणारच : बिचुकले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे असून, टरबुज्या मुख्यमंत्र्यांना राज्य चालवता येत नाही. यावेळी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच, असे मराठी बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

पुणेः राज्याला चांगला मुख्यमंत्री पाहिजे असून, टरबुज्या मुख्यमंत्र्यांना राज्य चालवता येत नाही. यावेळी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच, असे मराठी बिग बॉसमधील स्पर्धक अभिजीत बिचुकले यांनी आज (बुधवार) म्हटले आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना बिचुकले म्हणाले, 'शेतकरी व ग्रामीण भागात मोठ्या समस्या आहेत. समस्या दूर करण्यासाठी राज्याला चांगला मुख्यमंत्री हवा आहे. यावेळी जरी मी मुख्यमंत्री झालो नाही तर 2024 साली मी मुख्यमंत्री होणारच. उदयनराजे भोसले यांच्या विरोधात मी मागील 20 वर्षापासून निवडणूक लढवत आलो आहे. मला संसद सदस्य म्हणून दिल्लीत जायचे आहे. अखिल बहुजन समाज सेना पक्षाच्या माध्यमातून राज्यातील सर्वच्या सर्व 288 जागा लढविणार आहोत. या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष माझी पत्नी आहे. माझ्या पक्षात घरानेशाही चालणार नाही. बिग बॉसमुळे मला प्रसिद्धी मिळाली. मला सर्वाधिक टीआरपी आहे.'

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे, यावर बोलताना बिचुकले म्हणाले, 'शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करायला गेल्या पाच वर्षांत सरकार काय झोपले होते का? शरद पवार यांनी राज्याचा विकास केला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार जरी सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढले तरी मी त्यांच्याविरोधात निवडणूक लढविणार.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra next cheif minister me says abhijeet bichukale