फार्मसी प्रवेशाची आज शेवटची संधी

फार्मसी प्रवेशाची आज शेवटची संधी
Published on: 

पुणे, ता. २८ : राज्यातील ‘बी. फार्मसी’ आणि ‘फार्म.डी.’ अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या असून, आतापर्यंत २९ हजार ४० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. राज्यातील ५२८ महाविद्यालयांमधील एकूण ४७ हजार १९२ जागांपैकी १४ हजार ८७७ जागा अद्याप रिक्त आहेत. या जागांसाठी सध्या ‘संस्थात्मक फेरी’ राबविली जात असून, या प्रक्रियेचा गुरुवारी (ता. २९) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी गुरुवारी शेवटची संधी उपलब्ध असणार आहे.
महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘बी.फार्मसी’च्या चार वर्षांच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमासाठी आणि ‘फार्म.डी.’च्या सहा वर्षांच्या पूर्णवेळ पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील ५२८ फार्मसी महाविद्यालयांमध्ये एकूण ४७ हजार १९२ जागा उपलब्ध आहेत. यापैकी पहिल्या कॅप फेरीत सर्वाधिक १६ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर दुसऱ्या फेरीत ७ हजार ४३२, तिसऱ्या फेरीत २ हजार ९६० आणि चौथ्या फेरीत १ हजार ९१४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. चारही फेऱ्यांमधून एकूण २९ हजार ०४० विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले आहेत.

संस्थात्मक फेरीत १४ हजार जागा
रिक्त जागांसाठी २५ ऑक्टोबरपासून संस्थात्मक प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या फेरीत १४ हजार ८७७ जागा उपलब्ध आहेत. याशिवाय व्यवस्थापन कोट्यातील एक हजार ९९० जागाही प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) दोन हजार ८६६ आणि शिक्षण शुल्क सवलत योजनेंतर्गत (टीएफडब्ल्यूएस) ४०९ अशा एकूण तीन हजार २७५ जागा अतिरिक्त आहेत. या जागा केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेत भरल्या जात असल्याने संस्थात्मक फेरीसाठी उपलब्ध नाहीत. संस्थात्मक फेरीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी गुरुवारपर्यंत प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.

प्रवेशाची स्थिती
एकूण फार्मसी महाविद्यालये : ५२८
एकूण उपलब्ध जागा : ४७,१९२
चारही फेऱ्यांत झालेले प्रवेश : २९,०४०
संस्थात्मक फेरीसाठी रिक्त जागा : १४,८७७
व्यवस्थापन कोट्यातील जागा : १,९९०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com