

Amitesh Kumar Highlights Importance of Police-Citizen Collaboration
Sakal
पुणे : ‘‘शहराच्या सुरक्षेसाठी पोलिस आणि नागरिकांचा एकत्रित सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. तरुण पिढी ही देशाचे भविष्य असून, उत्तम चरित्र आणि जीवनात शिस्त असल्यास समाजातून गुन्हेगारी प्रवृत्ती संपेल. तसेच, तरुण पिढीने अमली पदार्थ, दारू व इतर व्यसनांपासून दूर राहावे,’’ असे आवाहन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले.