प्रत्येकाच्या 'डीपी'वर झळकतायत महाराष्ट्र पोलिस; काय आहे कारण?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 मे 2020

- हजारो नागरिकांनी आपल्या व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरच्या 'डिपी'वर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो झळकावित पोलिसांना केले 'चिअरअप'

- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संकल्पनेला नागरीकांनी दिला उदंड प्रतिसाद 

पुणे : मुंबईवरील दहशतवादी हल्ला,  महापुर असो किंवा कुठलाही बंदोबस्त. पोलिस कधीच मागे हटले नाही. एवढेच नाही, तर तब्बल दोन महीने कोरोनाशी लढा देताना कैक पोलिसांना कोरोना झाला, 4-5 जणाना विरमरणही प्राप्त झाले. अशा या जिगरबाज महाराष्ट्र पोलिस दलास प्रोत्साहन देण्यासाठी खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिसांचे बोधचिन्ह (लोगो) स्वत:च्या व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर 'डिपी' ठेवून लोकांनाही आवाहन केले. त्यास हजारो नागरीकांनी प्रतिसाद देत प्रत्येकाने व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरुन त्यांना 'चिअरअप' केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडुन वेगवेगळ्या माध्यमातुन पोलिस दलाला प्रोत्साहन देण्यास प्राधान्य दिले जाते.  कधी पोलिसांसमवेत रस्त्यावर उभे राहुन चहा घेत, तर कधी पोलिस व त्यांच्या कुटुंबियांची आपुलकिने संवाद साधत देशमुख पोलिसांचे मनोधैर्य वाढवितात. त्यानुसार, देशमुख यांनी शनिवारी आपल्या फेसबुक पेजवर "पोलिसांना साथ, कोरोनावर मात" अशा स्वरुपाचा एक मजकूर लिहिला. 

कोरोनाग्रस्तांवर उपचार करून घरी परतली नर्स; पतीने केले अशाप्रकारे स्वागत...

पोलिस हे दहशतवादी हल्ला, महापुर, धार्मिक सण-उत्सवांचा बंदोबस्त करतात. कुठलेही संकट असले तरी कधीच मागे हटत नाहीत. सध्या कोरोनाची साथ सुरु आहे. त्याचा तब्बल दोन महीने बंदोबस्त करत असताना अनेक पोलिसाना कोरोनाची लागण झाली, तर चार - पाच जणाना कोरोनाशी संघर्ष करताना विरमरण ही प्राप्त झाले. पोलिस आपल्या कुटुंबाचा व स्वत:च्या जिवाचा विचार न करता लढा देत आहेत. त्यांना मानसिक बळ देण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो आपल्या  व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरवर "डिपी" ठेवून लोकांनाही आवाहन केले. त्यास हजारो नागरीकांनी तत्काळ प्रतिसाद दिला. अनेक नागरीकांनी आपल्या व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटरच्या डिपीवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो वापरुन त्यांना "चिअरअप" केले. तसेच त्यांच्याबद्दल कृतज्ञता ही व्यक्त केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra Police logo flashes on WhatsApp Facebook Twitter DP