Police Sport Academy : पुण्यात लवकरच सुरू होणार महाराष्ट्र पोलीस स्पोर्ट अकादमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Police Sports Academy

पोलीस दलातील खेळाडूंना प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी पुढच्या वर्षी पुण्यात महाराष्ट्र पोलीस स्पोर्ट अकादमीचे काम सुरू होणार.

Police Sport Academy : पुण्यात लवकरच सुरू होणार महाराष्ट्र पोलीस स्पोर्ट अकादमी

घोरपडी - पोलीस दलातील खेळाडूंना प्रोत्साहन व प्रशिक्षण देण्यासाठी पुढच्या वर्षी पुण्यात महाराष्ट्र पोलीस स्पोर्ट अकादमीचे काम सुरू होईल, त्यासंदर्भात प्रस्तावाचे लवकरच काम सुरू होईल अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी ७१ व्या अखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर स्पर्धेलाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.

वानवडीमधील राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर आजपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,अप्पर पोलीस महासंचालक चिरंजीव प्रसाद, अप्पर पोलीस महासंचालक सीआयडी रितेश कुमार, सुनील रामानंद एस जयकुमार अनुप कुमार अभिषेक त्रिमुखे दीपक साकुरे प्रवीण पाटील नम्रता पाटील तसेच पोलीस दलातील महानिरीक्षक उपमा निरीक्षक व सर्व गटाचे समादेशक व इतर अधिकारी उपस्थित होते.

१६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत या स्पर्धा होणार असून या स्पर्धेमध्ये कुस्ती, कबड्डी, मुष्ठी युद्ध, पंजा कुस्ती, पॉवरलिफ्टींग, भारतोलन, शरीरसौष्ठव अशा विविध सात क्रीडा प्रकारांचा समावेश असेल.या स्पर्धा महिला व पुरुष या दोन्ही गटासाठी असून यामध्ये २७ राज्ये , ०५ केंद्रीय सशस्त्र पोलीस विभागांचे संघ , ०५ केंद्रशासित प्रदेशांचे संघ असे एकूण ३७ संघ सहभागी होणार आहेत. एकूण १५९६ पुरुष खेळाडू व ६३२ महिला खेळाडू व त्यांचे प्रशिक्षक, सहाय्यक ४११ असे एकूण २६३९ स्पर्धक उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध संघाने मान्यवरांना मानवंदना दिली. त्यानंतर कुस्तीपटू राहुल आवारे आणि वंदना जाधव तसेच महासंचालक रजनीश सेठ यांच्या हस्ते स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर बाबू नृत्य, लेझीमसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुढे बोलताना रजनीश सेठ म्हणाले की, या स्पर्धेमुळे पोलीस दलातील खेळाडूंच मनोबल वाढणार आहे. अशा स्पर्धेमधून ऑलिंपिक स्पर्धेकरीत नवीन खेळाडू तयार होतील, आणि देशाला ऑलम्पिक मध्ये पदक मिळवून देतील. सोबतच जानेवारीमध्ये राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा होणार असून त्यासाठी पोलीस दलातील खेळाडूंना खेळण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे. जे खेळाडू सरावासाठी प्रस्ताव पाठवतील त्यांना सवलत देण्यात येईल, त्यामुळे त्यांना प्रशिक्षणासाठी वेळ मिळेल.