

फोटो - संग्राम जगताप
....
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर
हिंदुत्त्ववादी संघटनांचे आंदोलन स्थगित
संग्राम जगताप; पोलिसांकडून न्याय मिळण्याची अपेक्षा
सकाळ वृत्तसेवा
अहिल्यानगर, ता. २० ः पोलिस प्रशासनाच्या विरोधात जनसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे. घडलेल्या घटनांमध्ये मुख्य आरोपी बाजूला ठेवून इतरांवर कारवाई होते. याबाबत हिंदुत्ववादी संघटना आज आंदोलन करणार होत्या, तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.
समाजमाध्यमांशी बोलताना जगताप यांनी या आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट केली. आज विविध संघटना उपोषण करणार होत्या. मुख्यमंत्र्यांनी फोनद्वारे संबंधितांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. कोणावरही अन्याय झाला असेल, तर त्यांचे ऐकून घेतले जाईल, योग्य ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी आश्वासन दिल्यामुळे हे आंदोलन स्थगित केले आहे. पोलिस प्रशासनाकडून सर्वांना न्याय मिळण्याची भूमिका असावी, अशी अपेक्षा जिल्ह्याची आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, मुकुंदनगरमध्ये वायरमनची काही लोकांकडून हत्या झाल्याने शहरासह जिल्ह्यात वातावरण तणावग्रस्त झाले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलने केली. असे प्रकार होऊ नयेत, हत्या करणारांवर कठोर कारवाई व्हावी, अशा मागण्या करण्यात आल्या. संबंधित घटनेचा तपास निःपक्षपातीपणे व्हावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच पोलिस प्रशासनावर नाराजीही व्यक्त केली. या सर्व पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या आंदोलनामुळे वातावरण अधिक तणावग्रस्त होईल, अशी भीती होती. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.