

Maharashtra Revenue Officers Transfer
esakal
पुणे: महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमधील कलम १५५चा गैरवापर प्रकरणातील पुणे विभागातील ४० अधिकाऱ्यांची विभागाबाहेर बदली करण्यात येणार आहे. पुन्हा या अधिकाऱ्यांना पुणे महसूल विभागात नियुक्ती देण्यात येणार नाही. त्यामुळे त्यांना एक प्रकारे पुणे विभागात कायमस्वरूपी बंदी घालण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. हस्तलिखित सातबारा उताऱ्यातील दोषदुरुस्ती करण्यासाठी महसूल अधिनियमाच्या कलम १५५ नुसार अधिकार देण्यात आले होते.