सकाळ इफेक्ट अखेर घरकुलच्या संकेतस्थळावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नाव आले
MGV26B15503
सोलापूर ः सात जानेवारी रोजी ‘सकाळ’मध्ये प्रकाशित झालेले वृत्त
सकाळ इफेक्ट लोगो वापरावा
अखेर ‘घरकुल’च्या संकेतस्थळावर आले महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नाव
विदर्भ कोकण बँकेच्या विलिनीकरणामुळे लाभार्थींना मिळत नव्हते अनुदान
सकाळ वृत्तसेवा
मंगळवेढा, ता. ७ : तालुक्यातील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या दोन शाखाचे विलीनीकरण १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र ग्रामीण बँकेत झाले. या विलीनीकरणाचा फटका तालुक्याच्या दक्षिण भागातील ३०० हून अधिक घरकुल लाभार्थ्याला बसला. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर पोर्टलवर या बँकेचे नाव आले.
आ. समाधान आवताडे यांनी यासंदर्भात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधीसाठी हा प्रश्न दिला असून ती लक्षवेधी ९ मार्च रोजी विधिमंडळाच्या पटलावर येणार आहे. तत्पूर्वी बँकेचे नाव या पोर्टलवर आल्यामुळे लाभार्थ्यातून समाधान व्यक्त केले जात आहे. मोदी आवास योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना व रमाई आवास योजनेचे अनुदान राज्य सरकार थेट बँक खात्यावर जमा करते. त्यामुळे तालुक्यातील जालिहाळ, भाळवणी, रडे, निंबोणी, पौट, जित्ती, चिक्कलगी, जंगलगी, सलगर खुर्द, सलगर बु, शिवणगी, सोड्डी, आसबेवाडी, बावची या गावातील ३०० हून अधिक रमाई व मोदी आवास घरकुल योजनेच्या लाभार्थीच्या हप्त्यांचे वितरण रखडले. विलीनीकरणानंतर खाते
क्रमांक ११ अंकी आणि आयएफसी कोडही बदलल्यामुळे सध्या घरकुलच्या पोर्टलवर ही बँक दिसत नाही. लाभार्थीचे खाते दुरुस्त करून नवीन खाते नंबर व आयएफसी कोड देखील अपलोड करता येत नव्हता. शिवाय अन्य बँकेचे खाते उघडताना तुमचे गाव आमच्या शाखेला दत्तक नसल्यामुळे त्यांचे खाते देखील उघडले जात नव्हते. अगोदरच घरकुलाला मिळणारे अनुदान तोकडे असून, तेही शासनाच्या उदासीन धोरणामुळे वेळेत मिळत नसल्यामुळे घरकुल लाभार्थी आणखीनच अडचणीत सापडले. घरकुलच्या संगणकीय प्रणालीमध्ये या बँकेचा समावेश करावा म्हणून १७ नोव्हेंबरला पंचायत समितीने प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सोलापूरला पत्र दिले; मात्र त्याच्यावर शासनाने अद्याप कोणतीही हालचाल केली नसल्यामुळे शासनाच्या धिम्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.
-------
घरकुलाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासन ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाठपुरावा करते. मात्र, बांधकाम केलेल्या लाभार्थीचे अनुदान वेळेत जमा करण्यासाठी प्रशासकीय हालचाली संथ असल्यामुळे गाव पातळीवर लाभार्थीच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत होते. पण अखेर या बँकेचे नाव आल्यामुळे या भागातील लाभार्थ्यांचा नवीन खाते उघडण्यासाठी होणारा नाहक त्रास टळला.
- राजू गाढवे, सरपंच, बावची
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

