
मार्केट यार्ड : कृषी उत्पन्न बाजार समितीने थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ९९.२७ एकर जमीन घेण्याचा संचालक मंडळाने निर्णय घेऊन पणन संचालक विकास रसाळ यांच्याकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. यावर रसाळ यांनी हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु पणन विभागाच्या अवर सचिवांनी जमीन खरेदी करण्यास मान्यता देण्यास पणन संचालक सक्षम प्राधिकारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जमीन खरेदीचा निर्णय पुन्हा पणन संचालकांच्या कोर्टात आला आहे.