
भाजपकडून नागरिकांना प्रजा बनवले जातय - सचिन सावंत
पुणे : गेल्या आठ वर्षात लोकशाही, आर्थव्यवस्था उद्वस्त झाली आहे, विरोधी पक्षही या देशात नको आहेत. संविधानाने आपल्याला नागरिक बनवले आहे, पण त्यास बाजूला ठेऊन प्रजा बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. समरतेच्या विषारी विळख्यातून समातवादी संविधानाला सोडविणे हे आपले कर्तव्या आहे, अन्यथा पुढच्या पिढीला तोंड दाखवायला जागा राहणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली.
देशातील व राज्यातील परिस्थितीवर महाविकास आघाडी व समविचारी संघटनांतर्फे महाराष्ट्र सद्भावना निर्धार सभा टिळक चौकात आयोजित केली होती. त्यावेळी सावंत बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे नेते उल्हास पवार होते.
सावंत म्हणाले, ‘‘सहिष्णू भारताचा चेहरा विकृत करण्याचा प्रयत्न होत आहे. देशात संविधानाक संस्थांना स्वातंत्र नाही, विचारवंताना ट्रोलकेले जात आहे, न्यायालयही हतबल झाले आहे. रोजगार मागणाऱ्या तरुणांच्या हातात दगड, तलवारी दिल्या जात आहे. त्यामुळ ही एकत्र येणे गरजेचे असून, राज्याच्या कानाकोपऱ्यात सद्भावना सभा घेणे गरजेचे आहे."तुका म्हणे अवघेची सोंग, तेथे कैसा पांडुरंग"असे तुकाराम महाराज म्हणतात. तशीच सध्याची सोंग आहेत. औरंगाबाद येथील सभेत भाजपच्या भाड्याच्या भोंग्याचा आवाज मर्यादेच्या पुढे गेल्यास त्याला लगेच ताब्यात घ्या, अशी टीका ही सावंत यांनी केली.
उल्हास पवार म्हणाले, ‘‘१९२५ ते १९४७ या काळात संघाच्या लोकांनी काय केले? तुम्ही कोणता संघर्ष केला? याचे उत्तर द्या, मी चर्चेला तयार आहे. तुम्ही गांधीजींना दुबळे म्हणता मग त्याचे आणि संत ज्ञानेश्वर, महावीर यांचे तत्वज्ञान सारखेच आहेत. त्यांना तुम्ही काय म्हणणार? राज ठाकरे यांची स्वतंत्र प्रतिभा असताना ते कोणाच्या तरी दबावाला बळी पडत आहेत.
बी. जी. कोळसे पाटील म्हणाले, आपल्या मतभेदांमुळे, मग्रूरीमुळे सामान्य जनतेला त्रास होत आहे. आपण प्रबोधन करण्यात कमी पडलो व बोटचेपी भूमिका घेतल्याने ही स्थिती आली आहे, आपले मतभेद विसरून जातीवादी शक्तीला रोखले पाहिजे.
सुभाष वारे म्हणाले, ‘‘हा महाराष्ट्र सर्व जाती धर्मांनी घडविला आहे. महाराष्ट्राची एकी सद्भावना संपवून सत्तेत जाण्यासाठी कारस्थान रचले जात आहे. अजान आणि भोंगे हे महाराष्ट्रातील प्रश्न नाहीत तर रोजगाराची गरज आहेत.
प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे शहर उपप्रमुख डाॅ. अमोल देवळेकर, माजी विरोधीपक्षनेत्या दीपाली धुमाळ, अभय छाजेड यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी,
काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, युवासेनेचे किरण साळी, माजी महापौर अंकुश काकडे, राजलक्ष्मी भोसले यावेळी उपस्थित होते.नितीन पवार यांनी सूत्रसंचालन केले.
Web Title: Maharashtra Sadbhavana Nirdhar Sabha On Behalf Of Mahavikas Aghadi And Like Minded Organizations On The Situation In The Country And The State Bjp Sachin Sawant
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..