

पुणे, ता. १० : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत एप्रिलमध्ये घेतलेल्या चौथी आणि सातवीच्या परीक्षेचा अंतिम निकाल आणि शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या सोमवारी जाहीर झाल्या. राज्यातील चौथीच्या शिष्यवृत्तीसाठी एक लाख ७६ हजार ५८६ विद्यार्थी पात्र ठरले असून, त्यातील १६ हजार ६९३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. तर, सातवीच्या शिष्यवृत्तीसाठी एक लाख १८ हजार ९६० विद्यार्थी पात्र ठरले असून, १६ हजार ५८८ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिलला चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल परिषदेच्या https://mscepune.in आणि https://2026-2.puppssmsce.in या संकेतस्थळांवर जाहीर केला आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल २५ जुलैला जाहीर करण्यात आला. त्यानंतर गुणपडताळणीसाठी अर्ज संबंधित शाळेमार्फत ऑनलाइन मागविण्यासाठी २५ जुलै ते दोन ऑगस्टदरम्यान दिला होता. या कालावधीत आलेले अर्ज निकाली काढून परीक्षांचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. या अंतिम निकालावरून शासनमान्य मंजूर संचांच्या अधीन राहून, तसेच शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार, ज्या जिल्ह्यात अथवा तालुक्यात मंजूर संच संख्येच्या प्रमाणात विद्यार्थी उपलब्ध झाले नाहीत, असे उर्वरित संच इतर जिल्हा आणि तालुक्याला हस्तांतरित करून शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली आहे.
राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र यादी आणि प्रमाणपत्र संबंधित शाळांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून दिली आहेत. शिष्यवृत्ती रक्कम प्रदान करण्याबाबत शिक्षण संचालक (योजना) यांच्याकडे गुणवत्ता यादीतील संबंधित विद्यार्थ्यांची शिफारस करण्यात येत आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेबाबतचा यापुढील पत्रव्यवहार कार्यालयाकडेच करावा, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.
निकालाची आकडेवारी
परीक्षेचे नाव : नोंदविलेले विद्यार्थी : उपस्थित विद्यार्थी : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी
इयत्ता चौथी : ६,९४,६०३ : ६,५७,३८२ : १,७६,५८६ : १६,६९३
इयत्ता सातवी : ४,६२,१४१ : ४,३३,८७० : १,१८,९६० : १६,५८८
एकूण : ११,५६,७४४ : १०,९१,२५२ : २,९५,५४६ : ३३,२८१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.