

पुणे, ता. ३१ : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांतील शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ‘सकाळ NIE- चित्रकला स्पर्धे’च्या पुणे आवृत्तीच्या जिल्हा पातळीवरील (ऑफलाईन) आश्रमशाळेतील विजेत्या विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येत आहेत. समृद्धी तानाजी केंगले, तेजस्वी राजेंद्र गमाले, अपेक्षा किसन मेमाणे व रोशनी बाळू मदगे यांनी विविध गटांत प्रथम क्रमांक पटकावला.
ही स्पर्धा १८ जानेवारी रोजी झाली. दरवर्षी प्रमाणे यंदाही स्पर्धेला महाराष्ट्र व गोवा या दोन्ही राज्यभरातून शाळांचा व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. राज्यभरातील प्रमुख शहरातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी, आदिवासी एकात्मिक प्रकल्प संचालित आश्रमशाळा, स्वयंसेवी संस्थांद्वारे संचालित वसतिगृहांमधील विद्यार्थी व विशेष आणि दिव्यांग शाळांमधील विद्यार्थीसुद्धा या स्पर्धेत सहभागी झाले होते. विजेत्यांना बक्षिस वाटपाबाबत लवकरच ‘सकाळ’तर्फे विजेत्यांशी संपर्क साधला जाईल.
पुणे जिल्हा विभाग- आश्रम शाळा
अ गट- प्रथम- समृद्धी तानाजी केंगले (शासकीय आश्रमशाळा माध्यमिक विभाग, टोकावडे, ता. आंबेगाव), द्वितीय- यशराज रवींद्र लष्कर (मतिमंद निवासी शाळा, दत्तनगर, इंदापूर), तृतीय- सिद्धी पांडुरंग मुद्रे (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, टोकावडे, ता. आंबेगाव), उत्तेजनार्थ- आदित्य बोऱ्हाडे (शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, खटकाळे, ता. जुन्नर).
ब गट- प्रथम- तेजस्वी राजेंद्र गमाले (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, असाणे, ता. आंबेगाव), द्वितीय- प्राची उल्हास गाडेकर (शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, घोडेगाव, ता. आंबेगाव), तृतीय- प्रीती अशोक दळवी (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, टोकावडे, ता. आंबेगाव), उत्तेजनार्थ
तन्वी विलास खंडागळे (शासकीय आश्रम शाळा, सोमतवाडी, ता. जुन्नर).
क गट- प्रथम- अपेक्षा किसन मेमाणे (शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, सोमतवाडी, ता. जुन्नर), द्वितीय- वेदिका भगवान लोहकरे (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, खिरेश्वर, ता. आंबेगाव), तृतीय- यश दत्तात्रेय भंडलकर (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, पांगारी).
ड गट- प्रथम- रोशनी बाळू मदगे (शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, टोकावडे, ता. आंबेगाव), द्वितीय- ऋतुजा राजू मधे (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, असाणे, ता. आंबेगाव), तृतीय- ओमकार सुदाम शेळकंदे (शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, खटकाळे, ता. जुन्नर), उत्तेजनार्थ- मनीषा धोंडू लोहकरे (शासकीय माध्यमिक कन्या आश्रमशाळा, सोमतवाडी, ता. जुन्नर).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.