

Maharashtra school student self-defense training
sakal
पुणे : ‘‘विद्यार्थ्यांमध्ये ‘राष्ट्र प्रथम’ या उद्देशाने देशप्रेम निर्माण व्हावे, यासाठी राज्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘सैनिकी प्रशिक्षण’ आणि विद्यार्थिनींसाठी ‘स्व-संरक्षण’ प्रशिक्षण उपक्रम एक फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याबरोबरच राज्यातील सर्व शाळांमध्ये सर्व जाती आणि धर्माच्या प्रबोधनकारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार असून या उपक्रमाची सुरवातही एक फेब्रुवारीपासून होणार आहे,’’ अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केली.