बारामती परिमंडलात ‘सेवा सेतू अभियाना’ला प्रतिसाद

बारामती परिमंडलात ‘सेवा सेतू अभियाना’ला प्रतिसाद
Published on: 

बारामती, ता. ६ : महावितरणच्या ‘सेवा सेतू अभियाना’ला बारामती परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध योजना ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बारामती, सातारा आणि सोलापूर या तीन मंडलांत एकूण १०७ ठिकाणी किऑस्क उभारण्यात आले आहेत. या किऑस्कला आतापर्यंत २१८० नागरिकांनी भेट दिली असून ५४८ वीजग्राहकांनी सौर प्रकल्पांसाठी नवीन अर्ज केले आहेत.
सोलापूर मंडलात ४५ किऑस्क उभारण्यात आले असून त्यांना ८३५ नागरिकांनी भेट दिली आणि सर्वाधिक ३२० नवीन अर्ज प्राप्त झाले. त्याखालोखाल सातारा मंडलात ५४ किऑस्कला ११२१ नागरिकांनी भेट दिली आणि १८२ अर्ज आले. बारामती मंडलात ८ किऑस्कला २२४ नागरिकांनी भेट दिली असून ४६ अर्ज प्राप्त झाले आहेत.
अभियानांतर्गत या किऑस्कवर प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यांची माहिती व मार्गदर्शन नागरिकांना दिले जात आहे.

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना
या योजनेंतर्गत १ किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी ३० हजार रुपये, २ किलोवॅटसाठी ६० हजार रुपये, तर ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पासाठी कमाल ७८ हजार रुपयांपर्यंत केंद्रीय अनुदान मिळते. घराच्या छतावर सौर प्रकल्प उभारून वीजबिलात बचत करण्याची संधी यामुळे ग्राहकांना उपलब्ध झाली आहे.

स्मार्ट योजना
ज्या वीजग्राहकांचा मासिक वीज वापर १०० युनिटपर्यंत आहे, त्यांना स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० हजार रुपये, अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ हजार रुपये, तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांसाठी केवळ २५०० रुपयांत १ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारता येतो. असा प्रकल्प सरासरी दरमहा सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती करू शकतो.


जास्तीत जास्त नागरिकांनी सेवा सेतू अभियानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या छतावर सौर प्रकल्प उभारून विजेबाबत स्वयंपूर्ण व्हावे.
-धर्मराज पेठकर, मुख्य अभियंता, बारामती परिमंडल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com