Distribution Schedule: Original Marksheets Available from Monday
sakal
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचे एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी (ता.२५) देण्यात येणार आहे. संबंधित उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत दुपारी तीन वाजता हे गुणपत्रक-प्रमाणपत्र दिले जाणार आहे.