MSC Bank
sakal
पुणे : तब्बल २५ वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या थकीत कर्जप्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ‘दीर्घ प्रलंबित थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर केली आहे. सुलभ अटी, पारदर्शक प्रक्रिया आणि कालबद्ध अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर आधारित या योजनेमुळे बँकेची अडकलेली मोठी रक्कम वसूल होण्याबरोबरच कर्जदार संस्थांनाही दिलासा मिळणार आहे.