Maharashtra State Cooperative Bank
sakal
पुणे - महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणाऱ्या निर्णयात राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला पाच हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज मंजूर केले आहे. एनसीडीसीकडून एवढ्या मोठ्या रकमेचे कर्ज मंजूर होणारी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील पहिली सहकारी बँक ठरली आहे. या निधीचा वापर बँकेच्या सभासद सहकारी संस्थांना पुढील कर्जपुरवठा करण्यासाठी करण्यात येणार आहे.