

पुणे, ता. ११ : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे देशातील सहकारी साखर कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये सर्वाधिक २१ पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त झाले आहेत. देशातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा ‘वसंतदादा पाटील पुरस्कार’ २०२४-२५ साठी पुण्याच्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला, तर २०२५-२६ साठी सांगलीच्या ‘क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड’ सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे. ही माहिती महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील आणि व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी शुक्रवारी (ता. ११) पत्रकार परिषदेत दिली.
या पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित राहणार आहेत.
---------------
राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार - गाळप हंगाम २०२४-२५ :
सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (वसंतदादा पाटील पुरस्कार) : भीमाशंकर सहकारी साखर कारखाना (पुणे)
सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना :
उच्च उतारा : श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना (कागल, कोल्हापूर)
इतर उतारा : द किसान सहकारी चिनी मिल्स (उत्तर प्रदेश)
ऊस विकास :
उच्च उतारा : प्रथम- श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना (कोल्हापूर), द्वितीय- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना (जालना), तृतीय- सह्याद्री सहकारी साखर कारखाना (सातारा).
इतर उतारा : प्रथम- सर्जु चिनी मिल्स (उत्तर प्रदेश), द्वितीय- फाझिलका (पंजाब), तृतीय- किसान चिनी मिल्स (उत्तर प्रदेश).
तांत्रिक कार्यक्षमता :
उच्च उतारा : प्रथम- यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना (सातारा), द्वितीय- डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना (सांगली), तृतीय- श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना (पुणे).
इतर उतारा : प्रथम- शहाबाद (हरियाणा), द्वितीय- नकोदर (पंजाब), तृतीय- भोगपूर (पंजाब).
आर्थिक व्यवस्थापन :
उच्च उतारा : प्रथम- श्री. खेडूत खांड उद्योग (गुजरात), द्वितीय- श्री. मढी विभाग खांड उद्योग (गुजरात), तृतीय- विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना (सोलापूर).
इतर उतारा : प्रथम- धर्मापुरी शुगर मिल्स (तमिळनाडू), द्वितीय- बटाला (पंजाब), तृतीय- बागपत (उत्तर प्रदेश).
उच्च साखर उतारा :
उच्च विभाग- भोगावती सहकारी साखर कारखाना(कोल्हापूर).
इतर विभाग- भोरमदेव शक्कर कारखाना (छत्तीसगड).
संस्थात्मक सामाजिक दायित्व (सीएसआर) :
उच्च विभाग- अशोक (अहिल्यानगर).
इतर विभाग- चेंगलरायण (तमिळनाडू).
------------------
राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार - गाळप हंगाम २०२५-२६ :
सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना (वसंतदादा पाटील पुरस्कार) : क्रांतीअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड (सांगली)
सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना :
उच्च उतारा : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग (सोलापूर).
इतर उतारा : कल्लाकुरिची-२ (तमिळनाडू).
ऊस विकास :
उच्च उतारा : प्रथम- चिदानंद बसप्रभू कोरे सहकारी साखर कारखाना (कर्नाटक), द्वितीय- सहकारी खांड उद्योग (गुजरात), तृतीय- सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना (सोलापूर).
इतर उतारा : प्रथम- कर्नाल (हरियाणा), द्वितीय- बुधेवाल (पंजाब), तृतीय- गंगा किसान चिनी मिल्स (उत्तर प्रदेश).
तांत्रिक कार्यक्षमता :
उच्च उतारा : प्रथम- नीरा भीमा सहकारी साखर कारखाना (पुणे), द्वितीय- विलास सहकारी साखर कारखाना (लातूर), तृतीय- श्री विघ्नहर (पुणे).
इतर उतारा : प्रथम- पानिपत (हरियाणा), द्वितीय- रमाला (उत्तर प्रदेश), तृतीय- किसान चिनी मिल्स (उत्तर प्रदेश).
आर्थिक व्यवस्थापन :
उच्च उतारा : प्रथम- श्री. नर्मदा खांड उद्योग (गुजरात), द्वितीय- श्री. खेडूत खांड उद्योग (गुजरात), तृतीय- श्री. सायन विभाग खांड उद्योग (गुजरात).
इतर उतारा : प्रथम- सुब्रमणिया सिवा (तमिळनाडू), द्वितीय- किसान चिनी मिल्स (उत्तर प्रदेश), तृतीय- नवलसिंग शक्कर कारखाना (मध्य प्रदेश).
सर्वोत्कृष्ट सहकारी आसवनी :
उच्च विभाग- प्रथम- श्री. हलसिद्धनाथ (कर्नाटक), द्वितीय- श्री. महुवा प्रदेश खांड उद्योग (गुजरात).
उच्च साखर उतारा :
उच्च विभाग- अजिंक्यतारा (सातारा).
इतर विभाग- भोरमदेव (छत्तीसगड).
संस्थात्मक सामाजिक दायित्व (सीएसआर) :
उच्च विभाग- राजारामबापू पाटील (सांगली).
इतर विभाग- आस्का (ओडिशा).
---------------
कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवनगौरव
सहकारी साखर उद्योगासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेल्या व्यक्तींना या वर्षापासून महासंघातर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा पहिला प्रतिष्ठित ‘जीवन गौरव पुरस्कार’ जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे (हुपरी-यळगूड, कोल्हापूर) संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जाहीर झाला आहे.
-----------------
नवीन पुरस्कारांची सुरुवात
महासंघाने सर्वोत्कृष्ट सहकारी बँक आणि ऊस संशोधक शास्त्रज्ञ यांनाही सन्मानित करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. २०२५-२६ साठी ‘उत्कृष्ट बँक’ म्हणून राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ नवी दिल्ली, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सुरत सहकारी बँक (गुजरात) यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, ऊस संशोधनातील सर्वोत्कृष्ट योगदानासाठी तमिळनाडूतील शुगरकेन ब्रीडिंग इन्स्टिट्यूटच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. के. व्ही. भाग्यलक्ष्मी यांना पुरस्कार देण्यात येणार आहे.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.