Animal Health India: पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी; राज्यात नव्याने ‘अ’ वर्ग पशुवैद्यकीय दवाखाने
Farmers Support: राज्यात नव्याने २,०५३ ‘अ’ वर्ग पशुवैद्यकीय दवाखान्यांची उभारणी होणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे जनावरांचे आरोग्य राखण्यासाठी अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत.
पुणे : पशुपालकांना त्यांच्या पशूंना उत्तम आरोग्य सुविधा देण्यासाठी राज्यात दोन हजार ५३ पशुवैद्यकीय दवाखाने सुरू होणार आहेत. हे सर्व ‘अ’ वर्ग पशुवैद्यकीय दवाखाने असतील. यामुळे राज्यातील दवाखान्यांची एकूण संख्या चार हजार ८५३ वर पोहोचेल.