
पुणे : गाव नकाशावर असलेल्या रस्त्यांबरोबरच शीव, पाणंद तसेच शासकीय कामांसाठी आणि सहमतीने तयार केलेल्या रस्त्यांची नोंद आता गावदप्तरी करावी. सातबारा उताऱ्यावरील इतर हक्कात त्यांची नोंद घेऊन त्यांना कायदेशीर आधार द्यावा, अशी महत्त्वपूर्ण शिफारस डॉ. सुहास दिवसे समितीने राज्य शासनाला केली आहे. त्यासाठी गावपातळीवर मोहीम राबवावी, तसेच त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.