
महाराष्ट्रात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मुळशीचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोस्टमॉर्टम अहवालात मारहाणीचे पुरावे आढळल्याने या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यात बोलताना कठोर शब्दांत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.