Vidhan Sabha 2019 : कष्टकरी आघाडीचा लांडगेंना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 October 2019

‘कष्टकरी जनतेचे सरकारदरबारी प्रलंबित प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आहेत. उर्वरित प्रश्‍न त्यांनी सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून कष्टकरी जनता आघाडीने भाजप- शिवसेना महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे,’’ असे कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले. भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विधानसभा 2019 : पिंपरी - ‘कष्टकरी जनतेचे सरकारदरबारी प्रलंबित प्रश्‍न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोडविले आहेत. उर्वरित प्रश्‍न त्यांनी सोडविण्याचे आश्‍वासन दिले आहे. त्यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून कष्टकरी जनता आघाडीने भाजप- शिवसेना महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे,’’ असे कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांनी सांगितले. भोसरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

भोसरीतील महायुतीचे उमेदवार लांडगे यांच्यासमवेत झालेल्या कष्टकरी जनता आघाडीच्या बैठकीत कांबळे बोलत होते. महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, कष्टकरी जनता आघाडीचे प्रल्हाद कांबळे, बळीराम काकडे, शोभा शिंदे, आशा कांबळे, दत्तात्रेय शिंदे, लालचंद पवार, नितीन ठक्कर, मल्हार काळे, कौसल्या नेटके, अनिता काजळे आदी उपस्थित होते. 

कांबळे म्हणाले, ‘‘देशात ४० कोटी, तर महाराष्ट्रात तीन कोटी असंघटित कामगार आहेत. त्यात रिक्षाचालक, टेम्पो ड्रायव्हर, ट्रक ड्रायव्हर, फेरीवाले, पथारीवाले, बांधकाम मजूर, घरकाम करणाऱ्या महिला, कागद, काच, कचरा वेचक आदी कष्टकऱ्यांचा समावेश आहे. या कष्टकरी जनतेचे अनेक प्रश्‍न सरकार दरबारी प्रलंबित होते. त्यातले अनेक प्रश्‍न मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोडवले आहेत. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापनेबरोबरच बांधकाम मजुरांसाठी अनेक कल्याणकारी योजना सरकारने राबविल्या आहेत. 

मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर कष्टकरी जनता आघाडीचा विश्‍वास आहे. ते कष्टकऱ्यांचे प्रश्‍न सोडवतील, अशी आम्हाला खात्री आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना युतीला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार महेश लांडगे यांना मोठ्या मताधिक्‍याने विजयी करण्याचा आमचा संकल्प आहे.’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra Vidhansabha 2019 aghadi mahesh landage politics