पालकमंत्री पत्रकार परिषद सातारा

पालकमंत्री पत्रकार परिषद सातारा
Published on: 

धरणाचे पाणी पिण्यासाठी राखीव

शंभूराज देसाई; ऑगस्टपर्यंतचे नियोजन, शेतकऱ्यांना तातडीने मदत

सातारा, ता. १५ : आगामी दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना जिल्ह्यातील धरणांचे पाणी ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्यासाठी व जनावरांसाठी पुरेल, असे नियोजन केले जाणार आहे. दहा टक्के पाणी राखीव ठेवून उरलेल्या पाण्यातून शेतीसाठी आवर्तने ठरविली जातील. त्यासाठी आचारसंहितेनंतर जिल्ह्यातील सर्व मंत्री व आमदारांच्या उपस्थिती बैठक घेऊन पाणी नियोजन आराखडा केला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दरम्यान, दुष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना आवश्यक मदत तातडीने केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठ्याचा आढावा घेण्याची सूचना केली आहे. त्यानुसार ऑगस्ट २०२७ पर्यंत धरणांतील पाणी पुरेल, असे नियोजन केले जाणार आहे. यामध्ये पिण्यासाठी, जनावरांना पुरेल अशा पद्धतीने नियोजन होईल. दहा टक्के पाणी राखीव ठेवावे लागणार आहे. कोयना धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत पाच टीएमसी कमी पाणी आहे. त्याबाबत चिंता व्यक्त होत असून, गेल्या वर्षी धरणात सात टीएमसी पाणी शिल्लक राहिले होते. त्यामुळे धरणांचा आढावा घेऊ. जिल्ह्यातील मंत्री आणि आमदारांची बैठक घेऊन पाणी नियोजन आराखडा तयार केला जाईल. जो भाग नैसर्गिक स्रोतावर अवलंबून आहे. तेथे मागणीनुसार टॅंकर पुरविले जातील. मागणी झाल्यास २४ तासांत टॅंकर सुरू होईल. त्यासाठी आठवड्याला आढावा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना आहे. काही लोकप्रतिनिधी शेतीसाठी पाण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी आचारसंहिता संपल्यावर नियोजन केले जाईल. काही विहिरींना पाणी असूनही वीजबिल थकल्याने कनेक्शन तोडले जात असेल, तर ते तोडता येणार नाही. याबाबत वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना करणार आहे. जिल्ह्यातील अकराही तालुके दुष्काळी जाहीर झाल्याने त्यांना १२ सवलती मिळणार आहेत. शेतकऱ्यांना पाच हजारांची मदत केली जाणार आहे. दुष्काळी संकटाला सामोरे जाण्यास शासन कटिबद्ध असून, कोणत्या परिस्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही. कोकणात मोठ्या प्रमाणात ओला चार असून, तो प्रायोगिक तत्त्वावर शासनाने खरेदी करून दिल्यास तोही आपल्याकडील जनावरांना वापरता येणार आहे. त्यासाठी आम्ही बैठकीत मागणी करणार आहोत.’’
विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे. राष्ट्रवादी व शिवसेनेला मागणीनुसार जागा मिळाली नाही. मतदारांची नाराजी काढायला वेळ लागेल, असेही त्यांनी नमूद केले.

..............................

चौकट
--------
समन्वयातून तोडगा काढू
-------
शेतकरी संघटनांची मागणी आणि कारखानदारांचे म्हणणे लक्षात घेता दोघांच्या बाबतीत अपेक्षित निर्णय होण्यासाठी समन्वयातून तोडगा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन मंत्री कारखानदार आहोत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही एकत्रित प्रेझेंटेशन करू. त्यांच्या मागणीवर योग्य तोडगा काढू, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले.
......................
पान १ चौकट
--------------
आरबीआयचा निर्णय मानावा लागेल
...
मंत्री देसाई म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी समन्वयाने चर्चा करण्याची जबाबदारी मंत्री शिवेंद्रसिंहराजे व मंत्री मकरंद पाटील यांच्यावर आहे. आता त्यांनी तारीख ठरवावी. आम्ही शिवसेना म्हणून बैठकीला जाऊ. ते आले नाहीत असे होणार नाही. आमची महायुती आहे. सोसायटीच्या अकरा जागा वगळता उर्वरित नऊ जागांवर चर्चा होऊन जागा वाटप ठरविले जाईल.’’ दहा वर्षांचा मुद्द्यावर रिझर्व्ह बॅंकेने घेतलेला निर्णय मान्य करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

....................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com